Thousands of Indians crammed into telegram offices today to send souvenir messages to friends and family in a last-minute rush before the service shuts down after 162 years. Today is the last day that messages will be accepted by the service, the world's last major commercial telegram operation, and the Central Telegraph Office in New Delhi said it was geared up to tackle the expected rush.
उधर मिस्र से गया मोर्सी का राज ...
इधर हिंदुस्थान से हटा ' मोर्सी ' का कामकाज ...
यह मेरा आखरी तार ... अलविदा तार ... अलविदा तार ...
१६३ वर्षांपूर्वी सुरू झालेली तारसेवा रविवार रात्री आठ वाजता काळाच्या पडद्याआड गेली. तारसेवेची शेवटची आठवण म्हणून अनेकांनी विशेषतः तरुणांनी अशी शेरोशायरीची उधळण करीत मित्रमंडळींना तार केली. शेवटची तार पाठवण्यासाठी चर्चगेटजवळच्या सीटीओ ऑफिसमध्ये रविवारी गर्दी उसळली होती. ' ही गर्दी कायम राहिली असती तर तार बंद झाली नसती ', अशा भावना व्यक्त करणाऱ्या तार खात्याच्या कर्मचाऱ्यांची मात्र वेगळीच 'हृदयाची तार ' छेडली गेली होती.
मोबाइल आणि ई-मेलच्या जमान्यात तारसेवा मागे पडली तरीही तीची विश्वासार्हता तसूभरही कमी झालेली नव्हती. पण , काळाच्या ओघात सरकारने तारसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. आज , १५ जुलैपासून तारसेवा बंद झाली. ही सेवा रविवारी रात्री आठवाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याने ' शेवटची तार ' करण्यासाठी सीटीओ म्हणजेच आताच्या ' बीएसएनएल ' च्या चर्चगेट येथील ऑफिसमध्ये रविवारी मुंबईकरांचा ओघ लागला होता. दिवसभरात १२ हजार तारा केल्या गेल्या.
तरुण मंडळींमध्ये तार करण्यासाठी उत्साह संचारला होता. बोरीवलीच्या सौमित्र मजमूदार याने शरोशायरीची उधळण करीत तार केली. इजिप्तमध्ये महमद मोर्सी यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागल्याने वर्षभरातच त्यांचे साम्राज्य संपले. त्याचा धागा पकडत सौमित्रने , ' उधर मिस्र से हटा मोर्सी का राज... इधर हिंदुस्थान से हटा ' मोर्सी ' का कामकाज ' असा उल्लेख करीत तार केली. ब्रिटिशांच्या काळापासून कडकट्ट... कडकट्ट.. अशा सांकेतिक भाषेत मोर्सकोडवरून तार पाठवली जात होती. त्याचा संदर्भ सौमित्रने घेतला होता.
तार पाठवण्यासाठी ब्रिटिश बनावटीची १८३४ मधील मोर्स मशिन आजही सीटीओ ऑफिसमध्ये आहे. मोर्स मशिनवर आलेला संदेश टिपून घेण्यासाठी जीव ओतून ' कडकट्ट कडकट्ट ' ऐकावे लागे. १९९०पर्यत मोर्स मशिनवरून तारा पाठवल्या जात होत्या , अशी आठवण चीफ टेलीग्राफ मास्टर अनघा खांबेटे व हेमलता चव्हाण यांनी सांगितली.
Maharashtra Times :

No comments:
Post a Comment