पुढील वर्षापासून मोबाईल ग्राहकांना भारतात कोठेही गेले तरी रोमिंग दर द्यावा लागणार नसल्याची, घोषणा केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी आज (सोमवार) केली.
मोबाईल ग्राहक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यास त्याला भरा लागणाऱ्या रोमिंग दराबाबत सिब्बल यांनी विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. इंटरनेट गव्हर्नन्स कॉन्फरन्समध्ये सिब्बल सहभागी झाले होते.
नॅशनल टेलिकॉम पॉलिसीनुसार मे महिन्यात सर्व रोमिंग दर हटविण्यात येणार आहेत. तसेच तोच मोबाईल नंबर भारतात कोठेही वापरता येणार आहे. त्यासाठी त्या ग्राहकाला कोणताही जादा शुल्क द्यावे लागणार नाही.
दूरसंचार मंत्रालयाचे सचिव आर. चंद्रशेखऱ यांनी सांगितले, की दूरसंचार मंत्रालयाने स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी नवी नोटीस तयार केली आहे. आम्ही सुरवातीला लिलावासंदर्भात सर्व गोष्टींचा विचार करणार आहोत. त्यानंतर रोमिंगच्या दराबाबत काम करणार आहोत.
No comments:
Post a Comment