नवी दिल्ली - मोबाईलवरुन रेल्वेचे तिकिट बुक
करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यासाठी इंटरबॅंकिंग मोबाईल पेमेंट सेवेचा (आयएमपीएस) उपयोग केला जाणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन रेल्वे केटरिंग ऍण्ड
टुरिझम कार्पोरेशन लिमिटेडने (आयआरसीटीसी) मोबाईल तिकिट बुकिंग ही सुविधा सुरु केली
आहे.
अशाप्रकारे तिकिट बुक
करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या क्रेडिट अथवा
डेबिट कार्डची गरज
पडणार नाही. शिवाय नेटबॅंकिगचीही आवश्यकता
भासणार नाही.
सध्या आयआरसीटीसीद्वारे दररोज चार
लाख
तिकिटांचे बुकिंग होते.
या
योजनेअंतर्गत पाच हजार
रुपयांपर्यंतच्या तिकिट बुकिंगचा खर्च पाच
रुपये व त्यापुढील तिकिटासाठीचा खर्च
10 रुपये पडणार आहे.
मोबाईल तिकिट बुकिंगच्या सुविधेबरोबरच लवकरच रोलिंग डिपॉझिट स्किम ही
योजनाही सुरु करण्यात येणार आहे.
या
योजनेअंतर्गत आपण आपला
मोबाईल क्रमांक आयआरसीटीसीमध्ये रजिस्टर करुन
त्यावर काही रक्कमही भरुन ठेऊ
शकतो.
ती
रक्कम आपल्याला कधीही रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी उपयोगी पडू
शकते.
Source : Sakal
No comments:
Post a Comment